औरंगाबाद : पैठण येथील तालुका भुमी अभिलेख कार्यालयाचे उपाधिक्षक जयदीप शितोळे यांना पंधरा हजारांची लाच घेताना लाचलुचपत नियंत्रक विभाग जालनाच्या पथकाने रंगेहात पकडले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
तक्रारदार यांच्या वडिलांचे नावे असलेले पैठण तालुक्यातील बिडकीन येथील जागेची नोंद सिटी सर्वेला करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता. त्यांनी उपअधिक्षक, तालुका भुमी अभिलेख यांच्याकडे जावून त्यांच्या वाट्याच्या क्षेत्रफळाची नोंद करणेबाबत विचारणा केली. त्यावेळी जे.एम.शितोळे यांनी ‘तुमच्या क्षेत्रफळाची नोंद करायची असेल, तर तुम्हाला मला २० हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणुन लाचेची मागणी केली.
कामासाठी तक्रारदारास उप अधिक्षक.जे.एम.शितोळे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली. शितोळे यांनी तक्रारदाराकडुन तडजोडीअंती १५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वत: पंचासमक्ष स्विकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचं ‘शिवसंपर्क अभियान’ चालू शकतं तर मग शिवभक्तांच्या शिवजयंतीवरच निर्बंध का ?
- ‘काँग्रेसचा खोटारडेपणा असाच सुरु राहिला तर काँग्रेस इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही’
- संजय राठोडांनी राजीनामा दिला ही माहिती चुकीची; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
- भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
- आगामी निवडणुकांबाबत महाविकास आघाडीचं ठरण्याआधीच भाजप-रिपाइंचं ठरलं ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

