रोहा : ‘सरकार येऊन 100 दिवस झाले पण आमच्या भावाला अजूनही बंगलाच मिळाला नाही,’ असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भाजपवर देखील निशाणा साधला आहे.
त्या रोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, ‘एरवी आम्हाला तत्वज्ञान शिकवणाऱ्यांनी बंगलेच सोडले नसल्याचा टोला सुळे यांनी भाजपला लगावला.
तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भेटायचं असेल तर ते अशक्य आहे. एकतर अजित पवार हे सकाळी 7 वाजताच मंत्रालयात जातात. दरवाजे उघडणाऱ्यांच्या आधी दादा तिथे पोहचतात. त्याचं कारण म्हणजे, आमच्या भावाला अजूनही बंगलाच मिळाला मिळाला नाही,’ असं सुळे म्हणाल्या.
दरम्यान, ‘आम्हाला तत्वज्ञान शिकवणारे बंगले सोडायला तयार नाही, त्यामुळे आमच्या मंत्र्यांना बंगलेच मिळत नसल्याचं म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी बोलताना नाराजी व्यक्त केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

