औरंंगाबाद : बेगमपुरा परिसरातील लालमंडी येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. शेख अंजुम शेख इसाक (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे.
शेख अंजुम यांनी शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास राहते घरी छताच्या लाकडी बल्लीला असलेल्या फॅनला ओढणीने बांधून गळफास घेतला होता. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच, त्यांनी शेख अंजुम यांना बेशुद्धावस्थेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असावी अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र त्याला पोलिसांकडून दुजोरा मिळाला नाही.
महत्वाच्या बातम्या
- ….तर पुजाराला संघाबाहेर करावे, गावसकरांनी मांडले मत
- ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारताची धावपटु हिमा दास दुखापतग्रस्त
- डब्ल्युटीसी गमावल्यानंतरही अमरनाथ यांच्याकडून विराटचे कौतुक
- ‘आठवणीतले दिवस’, फलंदाजीचा सराव करत असताना चाहरला आठवले शाळेतले दिवस!
- ‘फायनल हा एकच सामना असतो’ ; बेस्ट ऑफ थ्रीवरून कोहलीला सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

