बुलढाणा : राज्यात आज चार नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यासह आता राज्यात कोरोनाग्रस्थांचीवर पोहोचली आहे. नव्याने आढळलेल्या ४ रुग्णांना पैकी ३ पुण्यातील आणि १ साताऱ्यातील असून. राज्याच्या ग्रामीण भागातही करोना रुग्ण आढळल्याने काळजी वाढली आहे.
राज्यात काल एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला होता तर रात्री उशिरापर्यंत ८ नवे करोना रुग्ण आढळले होते. काल दिवसभरात राज्यात २३ नवे कोरोना ग्रस्थ आढळले त्या पार्श्वभूमीवर राज्यात संचार बंदी देखील लागू करण्यात आली तसेच कालपर्यंत राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ९७ वर पोहोचली होती आज तोच आकडा १०१ झाला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिखली मतदारसंघात तहसीलदार,पोलीस प्रशासन,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कोरोना विषाणू संसर्गावर प्रतिबंध घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल यावर आमदार श्वेता महाले यांनी चर्चा केली.
चिखली मतदारसंघातील हजारो नागरिक,विद्यार्थी मुंबई, पुणे,नागपूर औरंगाबाद व इतर महानगरात शिक्षण व कामानिमित्त गेले होतो.आता ते परत आले आहेत.परंतु गावातील मंडळी पुणे,मुंबई व इतर महानगरातून आलेल्या मंडळींकडे कोरोना संशयित असल्याचे समजून गावात प्रवेश नाकारत आहेत. सर्वांची तपासणी करणे शक्य नसल्याने आरोग्य यंत्रणेसह त्यांचे नातेवाईक सुध्दा यामुळे हतबल झालेले असल्याने कोरोनाच्या तातडीच्या प्राथमिक उपचारासाठी बुलढाणा जिल्ह्यात क्रिनिंग मशीन उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी बैठकीत केली.


