टीम महाराष्ट्र देशा : “पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन पक्ष विरोधी नेत्यांनी राजीनामा द्यावा. परळी विधान सभा मतदार संघात 18 हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे.पराभवाची जबाबदारी घेवून धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा”, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी केली आहे. बीडमध्ये भाजपच्या प्रीतम मुंडेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बजरंग सोनावणे यांचा दारूण पराभव केल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
काय म्हणाले क्षीरसागर?
शेतकरी पुत्राला उमेदवारी देणाऱ्या धनंजय मुंडेनी पक्षाचं निष्ठेने काम करणाऱ्याला बाजूला केलं. मागच्या दाराने पुढे आलेल्या नेत्यांनी जयदत्त अण्णा क्षीरसागर यांना बाजूला केलं. त्यावेळी क्षीरसागर विरोधात असतील तर गुलाल लागत नसतो हें आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेत दाखवून दिले होते मात्र पक्षानं तेव्हा देखील दखल घेतली नाही.
मात्र पंकजा मुंडेंच्या विकासच्या अजेंड्याला लोकांनी मदत केली आहे, असं म्हणत मुख्यमंञी देवेंद फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे अभिनंदन केलं. दरम्यान, बीड मधील राष्ट्रवादीच्या पराभव धनंजय मुंडेचा समजला जात आहे. येत्या निवडणुकीवर याचे परिणाम होतील असे भारत भूषण क्षीरसागर यांनी म्हटलंय. तसंच क्षीरसागर ज्यांच्या पारड्य़ात वजन टाकतात त्यांचा विजय होतो असंही ते म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

