Share

पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक सकाळी लवकर सुरु करण्याची गणेश मंडळांची मागणी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील गणपती बाप्पांच्या मिरवणुकी वरून वाद होण्याची शक्यता आहे. कारण मनाच्या गणपतींची मिरवणूक सकाळी लवकर सुरु करून रात्री लवकर संपवावी अशी मागणी काही मंडळांनी केली आहे. मात्र या मागणीचा विरोध मनाच्या गणपती मंडळांनी केला आहे. मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक संपायला संध्याकाळ होते. तोवर इतर मंडळांच्या मिरवणुकीला खोळंबून राहावं लागतं. त्यामुळे मिरवणूक सकाळी ७ वाजता सुरु करावी, अशी मागणी काही मंडळांनी केली आहे.

पुण्यातल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सकाळी १० वाजता सुरु होते. मंडईतल्या टिळक पुतळ्याला हार घातल्यानंतर मानाचे गणपती विसर्जन मार्गावर मार्गस्थ होतात. मुख्य मिरवणूक मार्ग असलेल्या लक्ष्मी रस्त्यानं ही मिरवणूक टिळक चौकात पोहोचते. मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक संपायला संध्याकाळ होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून शहरातील विसर्जन मिरवणूक लांबत जाते. शेवटचा गणपती विसर्जित व्हायला दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ होते. या सगळ्यामुळे मिरवणूक लवकर सुरु करून लवकर संपवण्याची मागणी पूर्व भागातील मंडळांनी केली आहे.

तर विसर्जन मिरवणूक लवकर सुरु केली तरी इतर मंडळं मानाच्या गणपतींपाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होत नाहीत असा दावा मानाच्या गणपती मंडळांनी केलाय. पूर्वीपासून चालत आलेली परंपरा मोडता कामा नये अशी मानाच्या गणपती मंडळांची भूमिका आहे.नागरिकांना होणारा नाहक त्रास, पोलिसांसह एकूणच व्यवस्थेवर येणारा ताण तसंच उर्वरित मंडळांच्या नाचण्या – वाजवण्यावर येणाऱ्या मर्यादा हे मिरवणूक उशिरा सुरु होण्याचे दुष्परिणाम आहेत. या अनुषंगानं पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर संपावी यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे मंडळांकडून सांगण्यात येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!