Share

दिल्लीत भाजपचा सुपडासाफ, आपचा दणदणीत विजय !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात भाजपचा विजयरथ जोरात असताना दिल्ली महापालिकेच्या पोटनिवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा सुपडासाफ केला आहे. गुजरात मध्ये महापालिका निवडणुकीत जोरदार एन्ट्री केल्यानंतर ‘आप’ने दिल्ली मध्ये देखील जोरदार प्रदर्शन केले आहे. दिल्लीतील पाच प्रभागांमध्ये पोटनिवडणूक होती त्यामध्ये चार जगावर आपने विजय मिळवला आहे, तर कॉंग्रेसला एका जागेवर विजय मिळवता आला आहे. मात्र भाजपला आपले खाते देखील खोलता आले नाही.

या निवडणुकीत रोहिणी-सी वार्डमधून आपचे उमेदवार रामचंद्र 2985 मतांनी जिंकले आहेत. तर शालीमार बागमध्ये आपच्या उमेदवार सुनीता मिश्रा 2706 मतांनी विजयी झाल्या आहेत. कल्याणपुरीमध्ये आपचे उमेदवार धीरेंद्र कुमार 7000 मतांनी जिंकले, त्यांनी भाजपच्या सियाराम यांना पाणी पाजले आहे. तर त्रिलोकपुरीमध्ये देखील आपने बाजी मारली. चौहान बांगर या सीटवर काँग्रेसचे माजी आमदार चौधरी मतीन अहमद यांचे पुत्र चौधरी जुबेर अहमद यांनी आपचे माजी आमदार हाजी इशराक यांना हरवलं आहे. हा मुस्लिम बहुल वॉर्ड असल्याने निकाल अपेक्षित होता.

या पोटनिवडणुकीमधून 2022 साली होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांची दिशा ठरवली जाईल तसंच जनतेचा कल कुणाकडे आहे हे देखील निकालातून स्पष्ट होत आहे. तिनही पक्ष्यांनी निवडणुकीनंतर जिंकण्याचा दावा केला होता पण त्यात आता आम आदमी पार्टीने बाजी मारली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!