मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत होते. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत आहेत.
मुंबईमध्ये कोरोनाचे दुप्पट रुग्ण झालेत, राज्याच्या दरवाजावर कोरोनाची दुसरी लाट धडक मारतेय. अचानक लॉकडाऊन करणं घातक असून जे लोक हे उघडा, ते उघडा म्हणून आंदोलन करत आहेत, ते तुम्हाला कोरोनापासून वाचविणार नाहीत. पक्ष जरुर वाढवा, पण कृपा करून कोरोना वाढवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केले आहे.
तुम्हाला कोरोनापासून वाचवण्यासाठी कोरोना योद्धेच मदतीला येणार आहेत. त्यांचा काही ठिकाणी सत्कार केला जातोय, परंतू तेच सत्कार करणारे मास्क घालत नाही आहेत. यामुळे लोकांनी मास्क घालावे, पुढील आठ दिवस मी वाट बघेल आणि लॉकडाऊनचा निर्णय घेईन, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे पुणे व नाशिक या शहरांमध्ये नाईट कर्फ्यूच्या सूचना दिल्या आहेत. तर, अमरावतीमध्ये मंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशांनुसार सोमवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे हे गृहमंत्र्यांनी सिद्ध करून दाखवावं; तृप्ती देसाईंच आव्हान !
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली नव्या मोहिमेची घोषणा
- …तर पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा लागेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- पूजाच्या वडिलांनी ‘हे’ सांगताच आल्या पावली परत फिरल्या तृप्ती देसाई
- काँग्रेसच्या जन आक्रोश रॅलीत ‘लैला मै लैला’चे लागले ठुमके
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
