Share

बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या ६ पैकी ५ मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावे निश्चित

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच या निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तसेच निवडणुकी आधी उमेदवाराला जनतेपर्यंत पोहचण्यासाठी पूर्ण वेळा मिळावा. यासाठी राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची नावे निश्चित करण्यावर भर दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या ६  पैकी ५  मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आहे. बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, केज, परळी, माजलगाव या पाच मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीडमधून संदीप क्षीरसागर, गेवराईतून अमरसिंह पंडित किंवा विजयसिंह पंडित, माजलगावमधून प्रकाशदादा सोळंके, परळीतून धनंजय मुंडे तर केजमधून नमिता मुंदडा, यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

दरम्यान,  बीड मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी हायव्होल्टेज लढत पाहिला मिळणार असल्याचं दिसत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तर त्यांच्या विरोधात त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवारी देणार आहेत. त्यामुळे बीड विधनासभा मतदारसंघात यंदा काका-पुतण्या असं राजकीय वॉर होणर असल्याचं सांगितल जात आहे. तर परळीमध्ये मुंडे भाऊ बहिण आमने-सामने येणार आहेत.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!