Share

दीपक मानकर यांच्या अडचणी वाढल्या, दहा दिवसात पोलिसांना शरण या न्यायालयाचा आदेश

Published On: 

पुणे : जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे, मानकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता, तो अर्ज फेटाळण्यात आला असून पुढील दहा दिवसात पोलिसांना शरण येण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला देखील फेटाळला होता. जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात दिपक मानकर यांच्यासह विनोद भोळे, सुधीर सुतार, अमित तनपुरे, अतुल पवार, विशांत कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आधी पोलिसांनी मानकर यांच्या इतर साथीदारांना अटक केली होती. मानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून गायब होते. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जमीन नाकारल्याने मानकर यांना जोरदार धक्का मानला जात आहे.

बालगंधर्व रंगमंदीर तोडू देणार नाही- दीपक मानकर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!