Share

विंडीज विरुद्धच्या निर्णायक सामन्याआधी टीम इंडियाला धक्का

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- भारत आणि वेस्ट इंडीज संघात तिसरा आणि निर्णायक सामना २२ डिसेंबरला कटकच्या मैदानात खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी उभय संघात सुरू असलेल्या मालिकेत दोनही संघ १-१ ने बरोबरीत आहेत.हैदराबाद येथील पहिला सामना विंडीजने ८ गडी राखून जिंकला. तर विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आलेला दुसरा सामना भारतीय संघाने १०७ धावांनी जिंकत बरोबरी साधली.

आता निर्णयाक सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजानं दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यातून माघार घेतली आहे. दीपक चहरने दुखापतीमुळे तिसऱ्या वन डेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी संघात नवदीप सैनीचा समावेश करण्यात आल्याची घोषणा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) केली.

बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीपक चहरच्या कमरेला दुखापत झाली. यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमकडून दीपक चहरच्या कमरेवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसरा एकदिवसीय सामना भारतीय संघाने १०७ धावांनी जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विंडीज कर्णधार केरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा भारतीय संघाने ५० षटकात ५ बाद ३८७ धावांचा डोंगर उभारला. तेव्हा प्रत्त्युतरादाखल विंडीजचा संघ ४३.३ षटकात सर्वबाद २८० धावा करु शकला.

महत्वाच्या बातम्या : 

https://twitter.com/Maha_Desha/status/1207621354511466497?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1207621602621345792?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!