Share

‘लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत करणारा निर्णय’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अयोध्येबाबतच्या महत्वपूर्ण निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. आजचा निर्णय हा लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत कारणारा निर्णय आहे. यामध्ये कोणाचा जय आणि पराजय झालेला नसून या निर्णयातून भारतीय अस्मितेचे प्रतिक आस्था मजबूत करणारा आहे, असे म्हणत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च नायायालायाच्या ऐतिहासिक निकालानंतर निवेदन केले.

ते म्हणाले की, देशासह महाराष्ट्रातही या निर्णयाचे स्वागत झाले आहे. देशभरातील जनतेने कोणताही अभिनिवेश न आणता हा निर्णय मान्य करायला हवा. शांतता आणि सलोखा राखला तरच भविष्यात प्रत्येक जाती धर्माचे सण शांततेत साजरे होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण या निर्नायचे स्वागत करूयात.

त्याचप्रमाणे, लोकशाहीची परंपरा या निर्णयाने अधिक मजबूत होणार आहे. हा निर्णय कोणाच्या बाजून अथवा विरोधात लागला नसल्याने त्यात कोणाचीही हार जीत नाही. देशातील जनतेच्या हितासही हा निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या काळात सर्वांनी मिळून एक नवीन भारत घडवू, राज्यातील जनतेने शांतता पूर्वक निर्णय स्वीकारला आहे. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावतील असे कोणीही वर्तन करू नये. असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1193082770047696897?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1193083683034386433?s=20

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!