Share

‘शेलार राज्यपालांना भेटून गेले अन लगेच राज्यपालांनी आपले अधिकार आठवत उद्धव ठाकरेंना लिहलं पत्र’

Published On: 

मुंबई : सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करुन झाला का? तरुणांच्या माथी जळीत बीए प्रमाणे कोरोना ग्रॅज्युएट बिरुदावली लागणार का? पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात अशा भयगंड निर्माण केलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधीत भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी आज राजभवनवर जाऊन कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली.

त्यानंतर लगेचच अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयावर राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त करत सर्व विद्यापीठांचे कुलपती म्हणून आपल्या अधिकारांची आठवण करून देणारं पत्र  मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राज्यात भगत सिंह कोश्यारी म्हणतात, राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती म्हणून विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विषयांसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मला आहेत. विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षे संदर्भातील निर्णय विद्यापीठ कायद्याच्या तरतुदीनुसारच घ्यायला हवा. मात्र सरकारने परीक्षा रद्द करण्याबाबत केलेली घोषणा कोणताही विचार न करता आणि कोणत्याही कायदेशीर बाबी लक्षात न घेता केली असून ती विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं नुकसान करणारी आहे.

२ जूनला राज्यपालांनी या संदर्भातच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावर्षी परीक्षा होणारी नाही अशा घेतलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या पत्राच्या उत्तराची आपण वाट पाहत आहोत. असं ही राज्यपालांना या नव्या पत्रात म्हटलंय.

त्याचबरोबर परीक्षा घेण्यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंची उच्च व तंत्र शिक्षण विभागाने समिती नेमली होती. या समितीचा अहवाल या विभागातील सचिवांना १० मे रोजी प्राप्त झालाय. मात्र तो अहवाल आपल्याला अद्यापही सादर करण्यात आलेला नाही. राज्यपालांची कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरशींगद्वारे जी चर्चा झाली होती त्यात कुलगुरूंनी परीक्षा घेण्यासंदर्भातील तयारीबाबत आपली भूमिका मांडली होती.

सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करुन घेतला का?

या संदर्भात कुलपतींच्या कार्यालयाने कुलगुरूंचा अहवाल आल्यानंतर आपण योग्य ते आदेश देऊ, असं राज्यपतींनी त्या बैठकीत कुलगुरूंना सांगितलं होतं. मात्र त्यापूर्वीच राज्यसरकारने घाईघाईत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करून नियमांच उल्लंघन केलेलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काल पत्र लिहून आमदार अँड आशिष शेलार यांनी पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते तर आज त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. शासनाने पदवी अंतीम वर्षांची परिक्षा न घेता सरासरी गुण देण्याचा व गुणसुधार कार्यक्रमात ऐच्छिक जाण्याचा तीन महिन्या नंतर त्यांची परिक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला तो सर्वसमावेशक विचार करुन घेला का? राज्यातील सर्व विद्यापीठ मिळून ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांचे काय? त्यांना प्रथम व व्दितीय वर्षात ATKT असल्याने त्यांना नापास करणार का? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत.

तसेच पुर्वी एका विद्यापीठाच्या उत्तर पत्रीका असलेला खोलीला आग लागल्याने त्यावर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यांच्या शैक्षणिक करिअरला जळीत बीए असे बिरुदावली लागली. तशी दुर्दैवाने बिरुदावली आता ‘कोरोना ग्रॅज्युएट’ म्हणून लागणार का? विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांचा विचार होणे आवश्यक आहे यासाठी आज आपण राज्यपालांची भेट घेतल्याचे आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले. पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांनी घेरले असून ते आपल्या शैक्षणिक करिअरबाबत भयभीत आहेत. त्यामुळे मा.कुलपतींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची योग्यवेळी दखल घेऊन त्यांना चिंतामुक्त करावे, अशी विनंती करण्यासाठी आपण मा. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना भेटलो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘सरकारने पास केलेल्या विद्यार्थ्यांना ‘कोरोना ग्रॅज्युएट’ म्हणून तर संबोधले जाणार नाही ना?’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!