टीम महाराष्ट्र देशा – राज्यभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक सून घोषित करण्यात आलं आहे. राज्यात शहरी तसेच ग्रामीण भागात नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, फक्त अत्यावश्यक परिस्थितीत घराबाहेर पडण्यास परवानगी आहे.
दुसरीकडे उन्हाळा वाढत असून राज्यातील जनतेला पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. लोकांना पाण्यासाठी नीलाजास्तव घराबाहेर पडावे लागत आहे. आता याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला असून याबाबतची माहिती राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालया कडून देण्यात आली आहे.
यानुसार लॉक डाऊन काळात गरज भासल्यास प्रांताधिकार्यांनी याबाबत निर्णय घेऊन ते सुरु करावेत परंतु यावेळी सोशल डीस्टन्सिंगचे पालन व्हावे अश्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
‘राज्यात लॉक डाऊनसुरू असताना पाणी टंचाईच्या निवारणासाठी टँकर्स मंजूर करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना प्रदान. टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना सोशल डीस्टन्सिंगचे पालन करावे- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश’
राज्यात #Lockdown सुरू असताना पाणी टंचाईच्या निवारणासाठी टँकर्स मंजूर करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना प्रदान. टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना #SocialDistancing चे पालन करावे- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री @GulabraojiPatil यांचे निर्देश pic.twitter.com/8IYlgNjKn9
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 23, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

