नवी दिल्ली : न्यूझीलंड महीला संघाने महीला विश्वचषकाच्या पाचव्या सामन्यात बांगलादेशला ९ विकेट्सने पराभूत केले आहे. पावसामुळे हा सामना २७-२७ षटकांचा खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने ८ विकेट्स गमावून १४० धावा केल्या होत्या.
या लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने हे लक्ष १ विकेट गमावत अवघ्या २० षटकात सहज रित्या पार केले. सुझी बेट्सला तिच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाइनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशची सुरुवात खूप चांगली झाली होती. शमिमा सुलतान आणि हक यांनी पहिल्या विकेट्ससाठी ९.२ षटकात ५९ धावांची सलामी भागीदारी केली. शमिमाने ३६ चेंडूत ३३ धावा केल्या. तर हकने ६३ चेंडूत ५२ धावांची अर्धशतकीय खेळी केली. त्यानंतर कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभरता आली नाही. न्यूझीलंडकडून एमी सेदेरवेटने २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना कर्णधार सोफी डिवाइन १४ धावा करून बाद झाली. त्यानंतर अमेलिया केर आणि सूजी बेट्सने १०८ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. केरने ३७ चेंडूत ४७ तर बेट्सने ६८ चेंडूत ७९ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

