टीम महाराष्ट्र देशा – जुम्मू काश्मीर मधील पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे. या भारताच्या इशाऱ्याने पाकड्यांची चांगलीच घाबरगुंडी उडलेली दिसत आहे.
भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करेल या भीतीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेले दहशतवाद्यांचे तळ पाकड्यांनी हलवण्यास सुरुवात केली आहे.
या भागातील दहशतवाद्यांना लष्कराच्या छावण्यांमध्ये लपवून ठेव्ण्यात आले आहे. सध्या भारताच्या सीमेजवळ फिरकू नका अशा सूचनाच या दहशतवाद्यांना देण्यात आल्याचे समजते आहे.
पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण दोन्ही देशांच्या सीमेवर मात्र भयाण शांतता असल्याने ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, अशी भीती पाकिस्तानला वाटू लागली आहे.
दरम्यान, पाकिस्तानला जशात तसे उत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या आयएसआयने दहशतवाद्यांना पुन्हा तयार करण्यासाठी रिफ्रेशमेंट कोर्स सुरू केला आहे. 28 दिवसांचा हा कोर्स पाकिस्तानी लष्कराचे लेफ्टनंट कर्नल इमरान घेणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

