Share

बाबा! केएल राहुलच्या दमदार शतकानंतर सुनील शेट्टीची लक्षवेधी पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत केएल राहुलची प्रभावी फलंदाजी सुरू आहे. मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर पडल्यानंतर त्याला मिळालेल्या सलामीचा पूर्ण फायदा या फलंदाजाने घेतला. नॉटिंघम कसोटीत शतकाला मुकलेल्या राहुलने लॉर्ड्सवर चमकदार फलंदाजी केली आणि कसोटीतील सहावे शतक पूर्ण केले.

कसोटी क्रिकेटमध्ये परतणाऱ्या राहुलने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर शानदार शतक झळकावले. रोहित शर्मासह डाव उघडण्याची संधी मिळालेल्या फलंदाजाने सलग दुसऱ्या सामन्यात संघासाठी दमदार खेळी केली. त्याने 137 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर संयमाने फलंदाजी करत हळूहळू शतकाच्या दिशेने पाऊल टाकले.

https://www.instagram.com/p/CSe6TeyCKTX/?utm_source=ig_web_copy_link

भारताला या मजबूत स्थितीमध्ये आणण्यात सर्वात मोठं योगदान देणाऱ्या राहुलवर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच आता कथित गर्लफ्रेंडचे वडील बॉलीवूड मधील जेष्ठ अभिनेते सुनिल शेट्टीनेही राहुलचं खास शब्दात कौतुक केलं आहे. सुनील शेट्टीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. राहुल आणि अथिया शेट्टीचे नाव अनेकदा जोडले गेले आहे. त्यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगते अशातच सुनील शेट्टी यांनी पोस्ट केल्यानंतर त्यांच्या या पोस्टची चर्चा आता सोशल मीडियावर चांगलीच रंगलीय. सुनील शेट्टीच्या या पोस्टवर के. एल. राहुलनेही हार्ट आणि मिठीचे इमोंजी पोस्ट करत प्रतिसाद दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!