टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीच्या सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. कोणत्या पक्षाकडे किती मंत्रिपदं जातील यावर यापूर्वीच एकमत झाले आहे. मात्र कोणत्या आमदाराला कोणतं मंत्रिपद मिळेल याबाबत उत्सुकता आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदासोबत गृहमंत्री पदही दिले जाईल अस खात्रीलायक वृत्त महाराष्ट्र देशाच्या हाती लागले आहे. अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पद जाणार आहे. पवारांना या आधीही उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ८० तासाचे का होईना अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पद भूषवले आहे. तर विलासराव देशमुखांच्या मंत्री मंडळात अजित पवार यांनी गृहमंत्री पद सांभाळलेले आहे. प्रशासनावर वचक, कामाची तत्परता आणि महाराष्ट्रभर असलेले कार्यकर्त्यांचे नेटवर्क हि त्यांची शक्ती स्थाने आहेत. स्पष्ट वक्ते अजित दादा उपमुख्यमंत्री पदी आणि कार्यकुशल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी या दोन्ही नेत्यांचा कार्यकाल बघणे औत्सुक्याचे ठरेल.
दरम्यान, मुंबई – पुणे महामार्गावर हे फ्लेक्स गेल्या 20 दिवस आगोदर पासूनच लागले आहेत. त्यामुळे फडणवीस-पवार यांच्या ८० तासांच्या सरकार नट्यानंतर देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ठाम विश्वास होता की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवारच पुन्हा उपमुख्यमंत्री होणार आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

