Share

‘महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट’

Published On: 

🕒 1 min read

जालना/प्रतिनिधी : संपूर्ण महाराष्ट्रात आंध्र प्रदेशातील कर्नूल येथील सोयाबीन बियाणे कंपनी व इंदोर येथील इगल सीड्स कंपनी यांनी शेतकऱ्यांची पूर्णतः फसवणूक केली असून दोन्ही कंपन्यांमार्फत विक्री करण्यात आलेले बियाणे पूर्णतः बोगस निघाले आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे बियाणे उगले नसल्याबाबतचे तक्रारी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात केल्या असून माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्याची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या तक्रारींचा विचार केला जात नसेल तर गुन्हे दाखल करा 13 जुलै रोजी कृषी सहसंचालक डॉक्टर डी एल जाधव यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसे न झाल्यास त्यांना अटक करून कोर्टात हजर करा असेही खंडपीठाने आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असे निर्देश देत औरंगाबाद जिल्ह्यात 22 हजार 831 तक्रारी दाखल झाल्या असताना या फायर मात्र तेवीस झाले आहेत याबाबत अधिकारी विक्रेते आणि बियाणे कंपन्या यांचे साटेलोटे असल्याचे ताशेरे औरंगाबाद खंडपीठाने ओढले आहेत.

अधिकारी बियाणे कंपन्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. बियाणी कंपनीही अधिकाऱ्यांनी केलेली हातमिळवणी महावीर ला महागात पडेल अशा कठोर शब्दात औरंगाबाद खंडपीठाने महा भिजला खडसावले आहे. बोगस बियाणे उत्पादक कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील खंडपीठाने दिले आहेत कृषी विभागामार्फत तक्रार घेतली जात नसेल तर शेतकऱ्यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी असे सांगत औरंगाबाद खंडपीठाने शेतकऱ्यांचे गुन्हे नोंदवून घेण्याबाबत सर्वच पोलिस अधीक्षकांना सूचना केलेली आहे.

त्यात कृषी विभागामार्फत गुन्हे दाखल केले जात नसतील तर तालुका कृषी अधिकारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल करा असेही औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे खंडपीठाच्या या निर्णयाचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी स्वागत केले असून शेतकऱ्यांची लूट करणारे आणि बोगस बियाणे विक्री करणाऱ्या लोकांना यामुळे चाप बसेल व शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले.

कोणतीही बियाणे प्रमाणित करतेवेळी त्यांची उत्पादन क्षमता निश्चित केली जाते.. त्यानुसार 70 टक्के पेक्षा अधिक उत्पादन क्षमता असणारे बियाणे विविध कंपन्या व महाराष्ट्र सरकारच्या बियाणे महामंडळाकडून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले. परंतु प्रत्यक्षात मात्र 9 टक्के पर्यंत सरासरी सोयाबीनची उगवन झाल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी बियाणे कंपन्यांनी तर शेतकऱ्यांना फसवलं आहेत परंतु शेतकऱ्यांची विश्वासार्हता असणारी बियाणे महामंडळ या शासनाच्या महामंडळामार्फत देखील शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधी प्रचंड रोष निर्माण झाला असून सरकारच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे वेळीच योग्य पद्धतीने बियाणे निर्मिती आणि दुसरी बाबत शासनाने काळजी घेतली असती तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले नसतं दुबार पेरणी साठी पूर्णतः शासन जबाबदार आहे असा आरोप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे.

बोगस बियाणे प्रकरणे शेतकऱ्यांनी घाबरता किंवा कोणत्याही दबावाला बळी न पडता समोर यावं व व यानंतर खाजगी कंपनी किंवा महाराष्ट्र सरकारचे बियाणे महामंडळ शेतकऱ्यांची फसवणूक करून बोगस बियाणे वाटप करणार नाही यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन बोगस बियाणे वाटप करणारी खाजगी कंपनी आणि बियाणे महामंडळ यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

महाराष्ट्र मध्ये सोयाबीन चे बोगस बियाणे शेतकऱ्यांना वाटप केले गेल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे भयानक संकट उभे राहिले असून त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. नामांकित कंपनीचे आणि महाराष्ट्र सरकारच्या बियाणे महामंडळाचे बियाणे शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने विकत घेतले होते परंतु या दोघांनीही विक्री केलेले बियाणे उगवले नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. बियाणे महामंडळ आणि बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रतिहेक्‍टरी आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी माजी मंत्री आमदार लोणीकर यांनी केली.

दुबार पेरणीचे मोठे संकट शेतकर्‍यांसमोर उभे राहिले असताना देखील शासन स्तरावर कोणताही ठोस निर्णय झाल्याचे निदर्शनास येत नाही. दुबार पेरणी चा कालावधी देखील पूर्णतः संपला आहे तरीदेखील आपल्या मंत्रिमंडळातील कृषीमंत्री यांनी ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवले नाही. त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना पेरणीसाठी मोफत बियाणे देण्याची घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात मात्र कृषिमंत्र्यांच्या या आदेशाला बियाणे कंपन्या आणि महाराष्ट्र सरकारचे बियाणे महामंडळ यांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र महाराष्ट्रासमोर स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडून दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे मिळणार या आशेपोटी अनेक दिवस पेरणी थांबलेली होती प्रत्यक्षात मात्र बियाणे न मिळाल्यामुळे खासगी सावकारांकडे जाऊन कर्ज घेऊन दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे या सर्व परिस्थितीसाठी शासन जबाबदार असून विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची माती केली असल्याचा घणाघात यावेळी लोणीकर यांनी केला.

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रचंड पाठपुरावा केल्याने जालना सेवली मंठा परतुर व आष्टी येथे खाजगी सोयाबीन बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खाजगी बियाणे कंपन्या किंवा महाराष्ट्र सरकारचे बियाणे महामंडळ यांनी बोगस बियाणे वाटप केले असले तरीदेखील गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत यासाठी शासनस्तरावरून अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले तरी चालेल परंतु खाजगी कंपन्या व बियाणे महामंडळ वर गुन्हे दाखल करू नका असे लिखित-अलिखित आदेश असल्याबाबत अधिकारी खासगीत बोलून दाखवतात विद्यमान महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांबाबत केवळ पुतना मावशीचे प्रेम असून शेतकऱ्यांची जीवन उध्वस्त झाले तरी विद्यमान शासनकर्त्यांना याबाबत अजिबात गांभीर्य नसल्याचा घणाघात यावेळी लोणीकर यांनी केला.

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे कोरोनामुळे निधन

छत्रपती खाली बसणार असतील तर आम्ही बाहेर लोकांना काय तोंड दाखवायचं ?

धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, लोकशाही, विविधता हटवून केंद्रातील भाजप आपला अजेंडा राबवू पहातंय- राष्ट्रवादी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!