Share

‘कोरोनो’मुळे मिरची निर्यातीवर संकट; २०० रुपये किलो वरुन मिरची १२५ रुपयांवर

Published On: 

🕒 1 min read

पुणे : चीनमध्ये आलेल्या कोरोनो व्हायरसमुळे चीनकडून लाल मिरचीची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे देशातील मिरची निर्यातीवर मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्या पाच दिवसात लाल मिरचीचे दर १९०-२०० रुपये किलो वरुन १२०-१२५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

यंदा देशात एकूण ३.२५ ते ३.५० करोड पोती उत्पादन होण्याची शक्यता आहे. भारतातून दर वर्षी मोठ्या प्रमाणात लाल मिरचीची निर्यात केली जाते. यामध्ये चीन हा मिरची खरेदी करणार सर्वांत मोठा ग्राहक आहे. त्यानंतर बांगलादेश, श्रीलंका, फिलीपिंस आणि थायलंड या देशामध्ये भारतीय लाल मिरची खरेदी केली जाते. सीड व्हरायटी लाल मिरची खरेदी प्रामुख्याने घरगुती मसाल्याचे कारखानदार अधिक करतात. परंतु चीनमध्ये आलेल्या कोरोनो व्हायरसाचा मिरचीच्या बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. ग्राहक नसल्याने निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे लाल मिरचीचे दर मोठ्या प्रमाणात घटले असल्याची माहिती दि फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ ट्रेडर्सचे अध्यक्ष व मिरचीचे व्यापारी वालचंद संचेती यांनी दिली.

दरम्यान बांगलादेश, फिलीपिंस, थायलंड या देशातून मागणी वाढल्याने थोडासा दिलासा असून, देशात प्रथमच गुंटूर बाजारात मोठ्या घडामोडी होत आहेत. दर वर्षी जानेवारीच्या सुरुवातील नवीन लाल मिरची बाजारात आल्यानंतर दर कमी होतात. परंतु या वर्षी आवक वाढून देखील दर कायम आहेत. परंतु येत्या काही दिवसांत चीनमध्ये कशी खरेदी होईल यावर दर चढ- उतार अवलंबून असणार आहेत.

याबाबत मिरचीच्या व्यापाºयांनी यापूर्वी मिरचीच्या दरामध्ये दररोज एवढे चढ-उतार होताना पाहिले नाहीत. आतापर्यंत लाल मिरचीचा दर किलो मागे १० रुपये वाढण्यासाठी १०-२० दिवस लागायचे. परंतु सध्या मिरचीच्या बाजारामध्ये दररोज मोठ्या घडामोडी होत असून, दर मोठ्या प्रमाणात कमी जास्त होत आहेत. असेही संचेती यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!