टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविषयी सोशल मीडियावर अश्लील कमेंट्स केल्याने पुण्यातील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात हा प्रकार घडला असून तक्रारीनंतर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर सहा जण वारंवार अश्लील कमेंट्स करत होते. चाकणकर यांनी ट्विटरवर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी ट्वीट केलं होतं. या टीकेचा राग मनात धरुन सहा जण रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर अश्लील शेरेबाजी करत असल्याचा आरोप आहे. याबाबतची माहिती रुपाली चाकणकर यांनी ट्वीटरवरून दिली आहे.
रुपाली चाकणकर यांचं ट्वीट-
महाराष्ट्रातील माता -भगिनींबद्दल अश्लील कमेंट्स करणाऱ्याची गय केली जाणार नाही. लक्षात ठेवा… ही रूपाली चाकणकर माता भगिनींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे.
काही दिवसांपूर्वी माझ्या फेसबुकच्या पोस्टवर अश्लील कमेंट्स करणार्यांवर गुन्हा दाखल झाला.समाजाला लागलेलं हे मळभ दूर झालेच पाहिजे..
असं नाही की शेरेबाजी करणाऱ्या त्या लोकांवर लगेच कारवाई केली,त्याआधी त्यांना काही कार्यकर्त्यांनी चांगल्या भाषेत समजावून सांगत समज दिली होती की तुम्ही चुकताय पण त्यांनी ते ऐकलं नाही आणि त्यामुळे गुन्हे दाखल केले
एक महिला व्यक्त होत असताना , समाजात वावरत असताना वेगळं स्थान निर्माण करत असते तेंव्हा तिला विरोध करता येत नसला की वाट्टेल ती अश्लील शेरेबाजी , कमरेखालची भाषा वापरणाऱ्या आणि शिवीगाळ करणाऱ्या लोकांची यापूढे गय केली जाणार नाही.
मी माझंच सांगत नाहीये तर सबंध महाराष्ट्रातील महिलांना सांगतेय मग ती कोणत्याही जातीची, धर्माची कोणत्याही वयोगटातील असू दे आणि महत्वाचं म्हणजे कोणत्याही पक्षातली असू दे ही रूपाली चाकणकर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,आता यापूढे रडायचं नाही तर लढायचं..
महाराष्ट्रातील माता -भगिनींबद्दल अश्लील कमेंट्स करणाऱ्याची गय केली जाणार नाही.
लक्षात ठेवा… ही रूपाली चाकणकर माता भगिनींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे.#साम_दाम_दंड_भेद @NCPspeaks @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/qFUc3Xmb27— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 22, 2020
असं नाही की शेरेबाजी करणाऱ्या त्या लोकांवर लगेच कारवाई केली,त्याआधी त्यांना काही कार्यकर्त्यांनी चांगल्या भाषेत समजावून सांगत समज दिली होती की तुम्ही चुकताय पण त्यांनी ते ऐकलं नाही आणि त्यामुळे गुन्हे दाखल केले.(२/१)
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 22, 2020
मी माझंच सांगत नाहीये तर सबंध महाराष्ट्रातील महिलांना सांगतेय मग ती कोणत्याही जातीची, धर्माची कोणत्याही वयोगटातील असू दे आणि महत्वाचं म्हणजे कोणत्याही पक्षातली असू दे ही रूपाली चाकणकर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,आता यापूढे रडायचं नाही तर लढायचं.. (४/१)
@NCPspeaks— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 22, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

