पणजी: गोवा विधानसभेच्या (Goa Elections) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज गोव्यात भाषण केले. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. तसेच गोव्यात भाजपचीच (BJP) सत्ता येणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गोव्यात पर्यटन वाढलं तर देशाचंही पर्यटन वाढणार आहे. त्यामुळे गोव्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी भाजपने पायाभूत सुविधांचा विकास केला. या आधीच्या सरकारच्या डोक्यात हा विषय नव्हता. ते दिल्लीत बसायचे आणि फक्त पर्यटनासाठी गोव्यात यायचे, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला आहे.
आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीची सुरुवात गोव्यातून झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी म्हणाले की, गोव्याच्या भूमीतच मी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली. आता भारताच्या प्रत्येक नागरिकाने तसा निश्चय केला आहे, असं मोदी म्हणाले. ज्यांना गोव्याची संस्कृती माहिती नाही त्यांनी गोव्याला लुटण्यासाठी गोव्याचा एटीएमप्रमाणे वापर केला. पण भाजपने गोव्याचा विकास केला, असंही मोदी यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘माणसं नाहीतच, हे तर हैवान’; चित्रा वाघ यांची तीव्र प्रतिक्रिया
- हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- सावधान! कोरोना नंतर आला नवीन आजार, केरळमध्ये सापडला पहिला रुग्ण
- “जन्मठेपेची शिक्षा सुनावली असली तरी…”; हिंगणघाट जळीतकांडाच्या निकालानंतर पीडितेच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया
- ‘माणसं नाहीतच, हे तर हैवान’; चित्रा वाघ यांची हिंगणघाट प्रकरणी प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

