Cricket South Africa withdraws charges of misconduct against head coach Mark Boucher
Cricket South Africa: दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षक मार्क बाऊचरला वर्णभेदाच्या आरोपातून दिलासा; वाचा नेमकं प्रकरण काय?
मुंबई: दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा प्रशिक्षक मार्क बाऊचरची (Mark Boucher) वर्णद्वेषाच्या आरोपांतून मुक्ता करण्यात आली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्यावरील वर्णद्वेषासह अनेक आरोप मागे घेण्यात आले आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये इंडिपेंडेंट सोशल जस्टिस अँड नेशन-बिल्डिंग (SJN)डुमिसा न्त्सेबेजा कडून अहवाल प्राप्त झाला होता, ज्याने बाऊचरवर अनेक आरोप केले होते. यानंतर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथची काही दिवसांपूर्वीच वर्णद्वेषाच्या आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात होती.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे CEO काय म्हणाले ?
“बाउचरवर जे आरोप झाले, त्यामुळे त्याला किती त्रास झाला असेल, याची आम्हाला कल्पना आहे. आम्हाला याबद्दल खंत वाटते. मार्क बाऊचरच्या कोचिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष कमालीचे प्रदर्शन केले आहे. खासकरुन कसोटी क्रिकेटमध्ये चांगला खेळ दाखवला आहे. बाऊचर आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफशिवाय हे शक्य नव्हतं” असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे CEO म्हणाले.
The Board of CSA has formally and unreservedly withdrawn all charges against Proteas head coach Mark Boucher
Full statement ➡️ https://t.co/mLzJNQtvza pic.twitter.com/tz2GDKRSdF
— Proteas Men (@ProteasMenCSA) May 10, 2022
मार्क बाऊचर हा क्रिकेटविश्वातील दिग्गज यष्टीरक्षक म्हणून ओळखला जातो. दरम्यान, २०१२ साली इंग्लंड दौऱ्यावर यष्टीरक्षण करताना डोळ्यावर बेल्स लागल्यानं त्याची कारकीर्द आकस्मिकपणे संपुष्टात आली. २०१९ पासून दक्षिण आफ्रिकेचा मुख्य प्रशिक्षक आहे. सीएसएनं दिलेल्या अहवालानंतर मार्क बाऊचरला मोठा दिलासा मिळाला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

