Share

सरकारी बँकांप्रमाणेच पतसंस्थांचे कामकाज देखील ऑनलाइन होणार…

Published On: 

पुणे: केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालयांमध्ये सर्व कामकाज ऑनलाईन होत आहे या पार्श्वभूमीवर पतसंस्थांचे कामकाजही ऑनलाइन व्हावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने सहकार आयुक्तांकडे केली होती. सर्व पतसंस्थांना दर तिमाहीला अहवालाद्वारे पतसंस्थेची आर्थिक आकडेवारी सहकार खात्याकडे सादर करावी लागते परंतु ही माहिती ग्रामीण पातळीवरून सहकार आयुक्त कार्यालयाकडे वेळेत पोहोचत नाही रिझर्व बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांच्या आर्थिक आकडेवारी ऑनलाइन दाखल करण्याचे बंधन घातले आहे या माहितीच्या आधारे आरबीआय प्रत्येक ती महिला देशाच्या आर्थिक धोरण ठरते परंतु सहकार खात्याचा पत संस्थांकडून आर्थिक आकडेवारी उपलब्ध होत नाही.

राज्यातील सहकारी पतसंस्था आणि सहकार खाते यांच्यातील समन्वय ऑनलाइन कामकाज करण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे या पोर्टलद्वारे सहकारी पतसंस्था आर्थिक आकडेवारी ऑनलाइन सहकार खात्याकडेदाखल करू शकतील या माहितीच्या आधारे सहकार खाते संस्थांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवू शकतील तसेच पतसंस्थांच्या ठेवीदारांचे खातेदारांच्या व्यवहारात पारदर्शकता येईल. सहकार खात्यातर्फे जारी केली जाणारी परिपत्रके किंवा सूचना या पोर्टलद्वारे सहकारी पतसंस्था न देता येतील या त्यामुळे पतसंस्थांचे भाग भांडवल, राखीव निधी, ठेवी, कर्जे बँकांची संख्या एन पी ए बाबतची आकडेवारी पोर्टल द्वारे उपलब्ध होऊ शकेल. हे पोर्टल मोबाइलवर देखील वापरता येणार आहे त्यामुळे इंटरनेट सर्व्हर डाऊन रेंज बाबत अडचण येणार नाही.

याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये सहकार आयुक्तांनी पतसंस्थांसाठी पोर्टल सुरू करण्यासाठी तत्वतः मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील पतसंस्थांची अचूक आकडेवारी सहकार खात्याकडे राहील ना नफा ना तोटा या तत्त्वावर सहकार खात्याला ही अचूक माहिती पुरवण्याची हमी फेडरेशन घेतली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!