Share

भेंडी बाजारात फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे पोस्टर्स पायदळी

Published On: 

मुंबई- फ्रान्सच्या नीस शहरात झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबई, ठाण्यात उमटले आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पोस्टर्स मुंबईच्या भेंडी बाजार परिसरात पायदळी तुडवण्यात आले. रझा अकादमीकडून हे पोस्टर लावण्यात आले होते. तर ठाण्यातही मुस्लिमांनी फ्रान्सच्या विरोधात आंदोलन केले.

तत्पूर्वी,पैगंबर मोहम्मद यांचे वादग्रस्त व्यंगचित्र विद्यार्थ्यांना दाखविल्याने कट्टरतावाद्यांकडून शिक्षकाचे मुंडके छाटण्यात आले होते. याविरोधात मॅक्रॉन यांनी उभे राहत कट्टरतावाला समूळ उखडून टाकण्याची मोहिम उघडली आहे. मात्र, मुंबईच्या भेंडी बाजारात रस्त्यावर मॅक्रॉन यांच्या विरोधाचे शंभरहून अधिक पोस्टर रस्त्यावर चिकटवण्यात आले आहेत.

दरम्यान, फ्रान्समधील नीस शहरामध्ये नोट्रे डेम चर्चबाहेर झालेल्या हल्ल्यात एका महिलेला जीव गमवावा लागला आहे यासह आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नीस शहराचे महापौर ख्रिस्तियन इस्त्रोसी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मॅक्रॉन यांना पाठींबा दिला आहे. कट्टरतावादाविरोधात आपण एकत्र लढू अशी प्रतिक्रीयाही फ्रान्सने यावेळी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फ्रान्स सोबत आम्ही दहशतवादाविरोधात एकत्र उभे राहू, असे मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!