Share

‘भ्रष्टाचाराचा कोव्हीड’; कोरोना काळातील भ्रष्टाचारावर भाजप आमदाराची पुस्तिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना काळात निर्माण करण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयाच्या उभारणीमध्ये, त्यातील साहित्यामागे, कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये, मास्क खरेदी, आदी गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. विक्रमी वेळात जम्बो रुग्णालय तयार करण्यामध्ये विक्रमी भ्रष्टाचार झाल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.

त्यांनी आकडेवारीसह हे आरोप केले होते. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा अधिक आहे, कारण त्यात कोणतीही लपवाछपवी नाही. सर्व रुग्णांचे आकडे हे पारदर्शक आहे. मी आयुष्यात कधीच खोटं बोललेलो नाही,’ असं स्पष्टीकरण देखील उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर भाजप नेत्यांनी विधान भवनाच्या परिसरातच कोरोना काळातील भ्रष्टाचारावर एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. मुंबईतील कोविड भ्रष्टाचारावर आमदार अमित साटम यांनी तयार केलेल्या एका पुस्तिकेचे आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले असून येत्या काळात महाराष्ट्रातील कोव्हीड भ्रष्टाचारावर देखील पुस्तिका तयार केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

यानंतर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा देखील समाचार घेतला. कोरोना संदर्भातील विरोधकांच्या मुद्याला ते उत्तर ते देऊ शकले नाहीत. त्यांनी एकही मुद्द्यावर समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांच्या भाषणानं महाराष्ट्राची निराशा केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चौकातलं भाषण आणि विधानसभेतील भाषण यातला फरक समजला नाही,’ असा वाटोळा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!