मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा दिवसेन-दिवस वाढत चालला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 96 लाखांच्या पार गेला आहे. या स्थिती पासून बॉलिवूड कलाकार ही बचावले गेले नाही आहेत. नुकत्याच वरुण धवन, नीतू कपूर आणि मनिष पॉल यांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले होते.
त्यानंतर आता कृति सेनन हिला कोरोनाची लागण झाल्याचे एका बातमीमधून समोर येत आहे. कृति सेनन ही चंदीगढ येथे राजकुमार राव याच्यासोबत तिचा आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. याच वेळी तिला कोरोनाची लागण झाली आहे. कृतिच्या एका वृत्तानुसार हि माहिती मिळाली असून कृति हिने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यान, आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’च्या शुटिंग दरम्यान स्टार कास्टला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अभिनेता वरुण धवन, अभिनेत्री नीतू सिंह आणि दिग्दर्शक राज मेहता, मनीष पॉल यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आज शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’: राज्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट…
- आज शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’, देशभरातून बळीराजाला समर्थन !
- भारत बंद विरोधात कंगना म्हणाली…
- डिसले गुरुजी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्कार
- भारत बंद विरोधात केंद्राला पाठींबा देण्यासाठी रस्त्यावर उतरा; विखेंचं शेतकऱ्यांना आवाहन

