टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. सरकारकडून नागरिकांना गर्दी करू नका असे आवाहन वारंवार केलं जात आहे. परतू घरी जाण्यासाठी नागरिकांनी प्रवास स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच काही व्यावसायिकांकडून नियम धाब्यावर बसूवून दुकानं आणि कंपनी उघडली जात आहेत.
कॉंग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी जनता कर्फ्यूच्या घोषणेला पाठिबा दिला तसेच तातडीने लॉक डाऊन करा अशीही मागणी केली आहे. आज कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हि मोदींना क्कादक निर्णय घ्या अस म्हटलं आहे.
त्यांनी ट्विटरवर आपले मत व्यक्त केलं. जलद आणि अधिक कडक करावाईनेच आपण कोरोनावर विजय मिळवू शकतो. परतू आपल्या सरकारच्या कठोर निर्णय न घेण्याच्या चुकांचा गंभीर परिणाम भारताला भोगावा लागणार आहे.’ असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.
Quick aggressive action is the answer to tackling the #Coronavirus . India is going to pay an extremely heavy price for our governments inability to act decisively.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 18, 2020
तसेच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या रविवारी होणाऱ्या जनता कर्फ्यूत होणार्या घंटा नादावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले,
कोरोनामुळे आर्थिक नुकसान होणार्यांना टाळ्या वाजवून काहीही होणार नाही. जनतेसाठी आर्थिक पॅकेज, टॅक्स ब्रेक द्या आणि कर्जफेडीला काही काळ स्थगिती द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
कोरोना व्हायरस हा आपल्या नाजूक अर्थव्यवस्थेवर मोठा आघात आहे. याचा छोटे, मध्यम व्यवसायिक आणि रोजंदारीवर जगणाऱ्या मजूरांवर सर्वाधिक प्रभाव झाला आहे. रोजंदारी करणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन गरजांचेही प्रश्न निर्माण झाले आहेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
टाळ्या वाजवून काहीही मदत मिळणार नाही. आज आर्थिक मदत, कर सवलत आणि कर्जफेडीला स्थगिती अशा एका मोठ्या पॅकेजची गरज आहे. यासाठी तात्काळ पावलं उचला, असं राहुल गांधी म्हणाले.
कोरोनावायरस हमारी नाज़ुक अर्थव्यवस्था पर एक कड़ा प्रहार है।
छोटे, मध्यम व्यवसायी और दिहाड़ी मजदूर इससे सबसे ज्यादा प्रभावित हैं। ताली बजाने से उन्हें मदद नहीं मिलेगी। आज नकद मदद, टैक्स ब्रेक और कर्ज अदायगी पर रोक जैसे एक बड़े आर्थिक पैकेज की जरुरत है।
तुरतं कदम उठाये!— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 21, 2020
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=vK5–X2kY2M
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

