🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी शनिवारी आरोप केला की, मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक आणि भाजप नेत्यांत संबंध आहेत. ‘छाप्यानंतर एनसीबीच्या समीर वानखेडेंनी सांगितले होते की, ८ ते १० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन तासांनंतरच ऋषभ सचदेवा, प्रतीक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांना सोडून देण्यात आले.
‘ऋषभ सचदेवा हा भाजप नेते मोहित भरतियांचा मेहुणा आहे. एनसीबीने या तिघांना कोणाच्या इशाऱ्यावरून सोडून दिले? ऋषभचे वडील आणि काका एनसीबीच्या कार्यालयात गेले होते. त्यांनी वानखेंडेचे मुंबई आणि दिल्लीतील भाजप नेत्यांशी बोलणे करून दिले. सोडण्यात आलेल्या तिघांच्या आणि वानखेडेंच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करावी.’ अशी मागणी मलिक यांनी केली होती.
मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे एनसीबीच्या कारवाईकडे अनेक जण संशयास्पद नजरेने पाहू लागले आहेत. मात्र, यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करत राष्ट्रवादीला गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. एनसीबीने ज्याला सोडले तो राष्ट्रवादीच्याच जवळचा असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे.
ते म्हणाले, ‘एनसीबीनं क्रूझवर केलेल्या कारवाईत अनेकांना पकडण्यात आलं होतं. यात जे लोक क्लीन होते. त्यांचा कशातच सहभाग नव्हता अशा लोकांना सोडून देण्यात आलं. ज्या लोकांकडे काही सापडलं होतं. त्यांनाच एनसीबीनं पकडले’.
ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. तरुण पिढीचे त्यातून मोठे नुकसान होते आहे. अशात एखादी संस्था ठोस कारवाई करीत असेल तर त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची गरज. जे सोडले त्यात राष्ट्रवादीशीही संबंधित. पण, त्याला बदनाम करणे अयोग्य! एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे! pic.twitter.com/684YsExUyp
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 9, 2021
‘ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे आणि याविरोधात जी संस्था काम करतेय त्या संस्थेच्या पाठिशी आपण उभं राहिलं पाहिजे. पण या प्रकरणात राजकारण केलं जात आहे. खरंतर ज्या लोकांना सोडलं. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस देखील होता. तो क्लीन असल्यामुळे मी त्याचं नाव घेत नाही. त्याचा सहभाग नसल्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणं अयोग्य आहे’, असे फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ मलिकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘प्रियंका गांधींच्या रुपाने इंदिराजींचे अस्तित्त्व पुन्हा दिसले!’ संजय राऊतांकडून ‘रोखठोक’ कौतूक
- ‘माफिया राज’ला सत्तेतील लोकांचा पाठिंबा; पंकजा मुंडेंचे मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
- मुलगा जेरबंद होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मंत्री पूत्र आशिष मिश्राला बेड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

