Share

प्लास्टिक पतंग, नॉयलॉन मांजाविरोधात मनपाची धडक कारवाई

Published On: 

नागपूर  : संक्रांतीच्या पर्वावर नागपुरात पतंगबाजी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजाविरोधात कारवाईसाठी मनपाने कंबर कसली आहे. सोमवारी (ता. २८) तीन झोनमध्ये केलेल्या पाच कारवाईच्या माध्यमातून सुमारे पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा वापराच्या बंदीबाबत एकीकडे जनजागृती होत असतानाच बाजारात काही व्यापारी त्याची विक्री करीत आहे. मनपा आयुक्तानच्या आदेशानुसार, अशा व्यापाऱ्यांवर मनपातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे.

सोमवारी (ता. २८) लक्ष्मी नगर झोनअंतर्गत एक, सतरंजीपुरा झोनअंतर्गत दोन आणि आशीनगर झोनअंतर्गत दोन कारवाई करण्यात आल्या. या माध्यमातून पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला. २२५ नग प्लास्टिक पतंग जप्तीची कारवाईही करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!