नवी दिल्ली : जगभरात करोना व्हायसरने थैमान घातला असून प्रत्येक देश आपल्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता अधिक काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर नुकताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही याचा प्रत्यय दिला. इतर वेळी भेट झाल्यावर हस्तांदोलन करणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांना नमस्ते करत स्वागत केलं. लिओ वराडकर बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये आले होते. सध्या करोनाने थैमान घातला असल्याने हे करणं गरजेचं असल्याचं यावेळी त्यांनी सांगितले.
तसेच डोनाल्ड ट्रप्म आणि मूळ भारतीय वंशाचे असणारे लिओ वराडकर यांनी तुम्ही एकमेकांना अभिवादन कसं केलं असं पत्रकारांनी विचारलं असता दोघांनीही हात जोडून नमस्ते करुन दाखवलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘आम्ही हस्तांदोलन केलं नाही. आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि आता काय करायचं असं एकमेकांना विचारलं. हे थोडं विचित्र होतं,” असं ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, “मी नुकताच भारत दौऱ्यावरुन परतलो आहे. मी तिथे हस्तांदोलन केलं नाही, आणि हे फार सोपं होतं. कारण ती त्यांची संस्कृती आहे,” असं ट्रम्प यांनी यावेळी बोलताना सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
