Share

आम्ही काळजी घेतली, ठणठणीत बरे झालो, आता तुम्ही काळजी घ्या…!, ‘त्या’ दाम्पत्याने पुणेकरांना दिला कानमंत्र

Published On: 

पुणे : देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. देशात 500 हुन अधिक तर महाराष्ट्र्रात 100 हुन अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पोहचला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली होती.

मात्र आता पुण्यासाठी एक आशेचा किरण उगवला आहे. पुण्यातील कोरोनाबधित पाहिले दांपत्य आता कोरोनामुक्त झाले आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

तसेच ‘१५ दिवसांत नायडू रुग्णालयात आमची चांगली काळजी घेण्यात आली. आम्हीसुद्धा डॉक्टरांचे नियम पाळले. आता पुणेकरांनीसुद्धा गर्दी न करता आपण कोणा संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही आणि आपल्याला कोणाची लागण होणार नाही, याची काळजी घ्या,’ अशा शब्दांत त्या दाम्पत्याने पुणेकरांना आवाहन केले आहे. असे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दिलं आहे.

दरम्यान, ‘आम्हाला कोणामुळे ‘करोना’ची लागण झाली, याची आम्हाला माहिती नाही. मात्र, त्रास झाला; म्हणून आम्ही नायडू रुग्णालयात आलो. येथील डॉक्टरांनी घालून दिलेले नियम, उपचार आम्ही पूर्णपणे पाळले. आता आम्ही पूर्ण ठणठणीत बरे झालो आहोत. गर्दी करू नका. सरकार उपाययोजना करीत आहे. त्यांना आपण नियम पाळून सहकार्य करू या. आम्ही काळजी घेतली, आता तुम्ही काळजी घ्या…’, असं आवाहन त्यांनी पुणेकरांना तसेच संपूर्ण राज्याला केलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!