Share

कोरोनाचा धसका : हस्तांदोलन करु नका, रामराम ठोका; अजित पवारांचा सल्ला

Published On: 

बारामती : भारतात ‘कोरोना’ व्हायरसचे काही संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ३९ झाली आहे. यापैकी २३ भारतीय तर १६ परदेशी नागरिक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील नागरीकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील रविवारी अशीच जागरुकता बारामतीत दाखवली, तसेच हस्तांदोलन टाळून नमस्कार केला. इंदापुरातील आपल्या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांनाही मोलाचा सल्ला दिला आहे. सध्या देशात कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे हस्तांदोलन करु नका, तर रामराम ठोका, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘कोरोनामुळे मी हस्तोदंलन टाळत आहे. तुम्हीही अशीच काळजी घ्या. काहींना वाटेल की उपमुख्यमंत्री झालो म्हणून मी असं करतोय, पण सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. आणि डॉक्टरांनीच दिलेल्या सल्ल्यानुसार हस्तांदोलन टाळून हात जोडून नमस्कार करीत आहे.’

दरम्यान, अजित पवार यांनी एकाही व्यक्तीशी हस्तांदोलन न करता हात जोडून नमस्कार करणेच पसंत केले. जोपर्यंत ‘करोना’ संपूर्णपणे जात नाही, तोपर्यंत आपण हस्तांदोलन करणार नाही, असा खुलासा पवार यांनी केला. ‘तुम्हीही हात जोडूनच नमस्कार करा. घरी हस्तांदोलन केले तरी चालेल मात्र, बाहेर मात्र हात जोडून नमस्कार करा,’ असे आवाहन पवार यांनी केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!