मुंबई : ‘जे. जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालयात ३०० खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि ६० खाटांचा आयसीयूू विभाग असेल त्याचप्रमाणे जीटी रुग्णालयात २५० खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि ५० खाटांच्या आयसीयू विभागाची व्यवस्था करण्यात येत आहे. ही दोन्ही रुग्णालये लवकरच सुरू होत आहेत,’ अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी दिली.
तसेच जे.जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी.टी. रुग्णालय येथे कोरोनाग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी सनदी अधिकारी विनिता सिंगल यांची नेमणूक करण्यात आली आहे,’ असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, राज्यात एका बाजूला कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असतानाच दुसऱ्या बाजूला कोरोनाचा संपर्क झालेल्या नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आणखी नवे कोरोनाचे 05 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 159 वर पोहोचली आहे.
शुक्रवारी दिवसभरात मुंबईतील भाभा आणि कस्तुरबा रुग्णालयात 9 रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आता कोरोनाग्रस्तांची संख्या 91 झाली आहे. सांगलीमध्ये नवे 12 रुग्ण तर नागपूरमध्ये 5 रुग्ण आढळले. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल 159 वर पोहोचली आहे. या वाढत्या कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातचं राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
