Share

दारुची दुकाने सुरू करून सरकारला लोकांचा जीव महत्त्वाचा आहे की दारु विक्रीपासून मिळणारा महसूल?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य सरकारकडून झोननिहाय नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात दारू दुकानांसह अन्य दुकाने सोमवारपासुन सुरू झाली असून दारुच्या दुकांनासमोर मोठ्या प्रमाणात मोठी गर्दी पाहायला मिळाली.

याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘दारुची दुकाने सुरू करून सरकारला लोकांचा जीव महत्त्वाचा आहे की दारु विक्रीपासून मिळणारा महसूल? ,’ असा सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, ‘दारुच्या दुकानांमुळे पोलिसांवरील ताण वाढणार असून कोरोनाचा अधिक फैलाव होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक घरात दारूवरून कलह निर्माण होऊ शकतील,’ अशी भीती हजारे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, ‘दारूची दुकाने सुरू करण्याचा सरकारचा निर्णय अविचारी आहे. याला ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ असे म्हणता येईल,’ अशा तिखट शब्दात अण्णा हजारे यांनी सरकारवर शाब्दिक निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

स्थलांतरित कामगारांसाठी रोहित पवारांचं महत्त्वाचं आवाहन, म्हणाले…
लॉकडाऊनची भीषणता! औरंगाबादमध्ये १४ मजूरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!