Share

स्थलांतरित कामगारांसाठी रोहित पवारांचं महत्त्वाचं आवाहन, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : औरंगाबादमध्ये जालन्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या १४ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सटाणा शिवारात ( करमाड डीएमआयसी परिसर) रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडली गेले आहेत. लॉकडाऊनमुळे जालन्यात अडकलेले मजूर रेल्वे रुळावरुन औरंगाबादच्या दिशेने पायी येत होते.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ट्वीट करत रोहित पवार म्हणतात, ‘औरंगाबादजवळ मालवाहू रेल्वेखाली चिरडून जालना इथल्या स्टील कंपनीत काम करणाऱ्या १५ ते १६ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी सुन्न करणारी आहे.’

तसेच ‘कामगारांची गावाकडे जाण्याची सोय केली जात असताना त्यांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये,’ असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, ‘जालन्यातील एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाण्यासाठी पायी औरंगाबादकडे निघाले होते. औरंगाबाद येथून गावी जाण्यासाठी रेल्वे पकडणार होते. जालना ते औरंगाबाद रेल्वे रूळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. सर्वजण झोपेत असतानाच मालगाडी वरून गेल्यामुळे १४ जणांचा चिरडून मृत्यू झाला. तर पाच मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

लॉकडाऊनची भीषणता! औरंगाबादमध्ये १४ मजूरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू
…त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दारुची दुकाने उघडी ठेऊ नये – पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!