Share

कोरोनाचा संसर्ग वाढतोय, पोलीस गस्त वाढविली तरच कोरोनाचा संसर्ग टळेल

Published On: 

मुखेड : आज संपूर्ण जगात कोरोना व्हायरस ने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे भारतात ही भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागातील नागरिक रोजगार व नोकरी निमित्त पुणे, मुंबई, दिल्ली, हैद्राबाद आशा देशाच्या विविध भागातून मंगळवारी एकाच दिवशी सुमारे १ हजार २७७ नागरिक मुखेड तालुक्यात दाखल झाले आहेत. तर २० ते २४ मार्च पर्यंत जवळपास ४ हजार नागरिक आल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.

त्यामुळे गावो गावी शेकडो नागरिक खेडे गावात परत आली आहे. मात्र हे परत आलेले नागरिक ज्यांना होम क्वारंन्टाईन चा सल्ला देण्यात आला आहे, असे लोक गावातील नागरिकांत सर्रास पणे वावरताना दिसून येत आहे. मात्र ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक जे पूर्वीपासून गावात राहतात त्यांना या आजाराविषयी तितकीशी जाणीव नसल्याने मुक्त पणे या एकमेकांत वावरताना आढळून येत आहेत. राज्यात जमावबंदी , संचारबंदी चे नियम लागू असताना सुध्दा नागरिक मुक्त पणे वावरत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती पाहता ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

दि. २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही पुढचे २१ अख्खा देश लॉकडाऊन केल्याची घोषणा केली. मात्र आज देशात कोरोना रुग्ण संख्या दिवशेंदिवस वाढत असल्याने संसर्ग टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही पोलीस गस्त वाढवणे आणि नागरिकांत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे जिकरीचे बनले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!