Share

कडू कारल्यावर कोरोनाचे संकट, मेहनतीने पिकवलेले पिक शेतातचं फेकून दिले

Published On: 

🕒 1 min read

रायगड :राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने राज्याने लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर याचा नक्कीच  परिणाम होत आहे. तसाच परिणाम शेतीवर देखील झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना शहरातील बाजारपेठांपर्यंत पोहचता येत नसल्याने त्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना आपला माल शेतातचं फेकावा लागत आहे.

अशीच परिस्थिती रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर देखील आली आहे. शेतकऱ्यांवर शेतात पिकवलेली कारली पुन्हा शेतात फेकून देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. रायगड जिल्ह्यात  मोठ्या प्रमाण कारल्याचे उत्पादन घेतले जाते. हे निघालेले पिक मुंबई-पुण्यासारख्या शहरात   विक्रीसाठी जात असते. मात्र सध्या बाजारातील मागणी कमी झाल्याने   आणि वाहतुकीस बंधने असल्याने  हा माल जागेवरच पडून आहे.

त्यामुळे आता शेतकऱ्याला मेहनतीने घेतलेले पिक आपल्याच वावरात फेकून देण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घाऊक बाजारात कारल्याचा प्रचंड साठा झाला आहे. मुंबईला कारली साठवण्यासाठी मार्केटमध्ये जागेचा तुटवडा आहे. याच कारणाने व्यापाऱ्यांनी कारली शेतकऱ्यांकडून नेण्यासाठी नकार दिला आहे.

दरम्यान कारले व्यतिरिक्त आंबा, रानमेवा यावर देखील कोरोनाचा परिणाम झाला आहे. बाजारात फारशी मागणी नसल्याने फळ देखील नासून जात आहेत. यावर राज्य सरकारने तोडगा काढावा असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे.

देशातील लॉकडाउन बाबतचा मोठा निर्णय | PM Modi Announced Big Decision About India’s Lockdown

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!