मुंबई : काही दिवसांपूर्वी कोरोना लस घेणार नाही असे जाहीर केले केलेली अभिनेत्री पूजा बेदी. मात्र आता ती स्वत:च्या कोरोनाच्या विळख्यात अडकली असून तिने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंडही कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. तसेच मुंबईत लसीकरण मोहीम जोरात सुरु असताना दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदीनं कोरोना लस घेणार नाही, असा निर्णय घेतला होता.
मात्र तिचा हा निर्णय चुकला असून नुकतंच तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पूजाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. ‘मला कोरोनाची लागण झाली आहे. माझ्यासोबतच माझा बॉयफ्रेंड आणि काम करणारी मोलकरीण यांनाही कोरोना झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मला काही अलर्जी झाली होती. यानंतर मला अचानक खोकला सुरु झाला. त्यासोबतच तापही येत होतो. यामुळे मी कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. नुकतंच कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले,’ असे तिने सांगितले.
https://www.instagram.com/tv/CVIRbT4NcPM/?utm_medium=copy_link
त्याचप्रमाणे मी कोरोनापासून वाचण्यासाठी कोणतीही लस घेणार नाही. त्याउलट नैसर्गिक प्रतिकारशक्ती, पर्यायी उपचारपद्धती आणि निरोगी उपायांनी कोरोना बरा होऊ शकतो. कोरोना हा बरा होतो. त्यामुळे घाबरुन जाऊ नका,’असे आवाहन तिने या व्हिडीओद्वारे केले आहे. ‘यानंतर तिने या व्हिडीओत कोरोना काळात आपण काय खाऊ शकतो आणि काय नाही याची माहिती दिली आहे. यात तिने उसाचा रस, काढा, ताजी फळं, वाफ घेणे आणि कार्बोल टॅबलेट घेऊ शकता, असे पूजा म्हणाली. त्यासोबत पाण्यात मीठा टाकून त्यातून गुळण्या करा,’ अशा सूचनाही तिने केल्या आहेत. दरम्यान अभिनेत्री पूजा बेदीने जानेवारी महिन्यात कोरोना लसीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी तिने हे प्रश्न उपस्थित करत डब्ल्यूएचओ आणि फायझर कंपनीला टॅग केले होते. कोरोना लस न घेणे हे किती महाग पडतेय, अशी चर्चा देखील तिच्या पोस्टवर होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- आर्यन खानच्या सुटकेसाठी शिवसेनेच्या नेत्याने सर्वोच्च न्यायालयात केली याचिका दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

