Share

कोरोना व्हायरसचा परीक्षेला पुन्हा फटका ; CA च्या परीक्षा होणार ?

Published On: 

नवी दिल्ली : जगभरात कोरोना थैमान घातले आहे. महाराष्ट्र, तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लोकडोऊन आहे, याचा खूप मोठा परिणाम हा शिक्षणावर आणि परीक्षेवर होताना दिसत आहे. नुकतेच अखिल भारतीय स्तरावर सीएची परीक्षा घेता येण कठीण आहे, असं इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटण्टस ऑफ इंडियाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे.

वरिष्ठ वकील रामजी श्रीनिवासन यांनी आयसीएआयच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. सीएची परीक्षा २९ जुलैपासून सुरु होणार आहे, पण परीक्षा केंद्रांशी संपर्क साधून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागितला आहे आणि १० जुलैपर्यंत खटल्याच्या सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तेव्हा खंडपीठाने रामजी श्रीनिवासन यांची स्थगितीची मागणी मान्य केली. सर्वोच्च न्यायालयाने आयसीएआयला जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती स्थिर आणि उत्साहवर्धक नसल्याचे सांगितले.

१५ जून रोजी आयसीएआयने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, विद्यार्थी ऑप्ट-आऊटचा म्हणजे परीक्षा न देण्याचा पर्याय निवडू शकतात. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ते पुन्हा परीक्षा देऊ शकतात. ऑप्ट-आऊटचा पर्याय निवडण्यासाठी आयसीएआयने ३० जून पर्यंतची मुदत दिली होती. २९ जुलै ते १६ ऑगस्ट या काळात सीएची परीक्षा होणार आहे.

अनुभा श्रीवास्तव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठाने सुनावणी घेतली. त्यांनी सीएच्या परीक्षेसाठी जास्तीत जास्त परीक्षा केंद्रांची मागणी केली आहे. आणि ऑप्ट-आऊटच्या या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आयसीएआयचा हा निर्णय पक्षपाती आणि मनमानी पद्धतीचा असल्याचा श्रीवास्तव यांचा आरोप आहे.

हाॅटस्टारची मोठी घोषणा : बाॅलिवूडचे आगामी 7 बिग बजेट सिनेमे दिसणार OTTवर

गरिबांच्या खात्यात प्रति महिना ७५०० रू. थेट जमा करा – थोरात

मग तुम्ही काय फक्त मातोश्रीत बसुन गोट्या खेळणार का ? नितेश राणेंचा घणाघात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!