Share

मग तुम्ही काय फक्त मातोश्रीत बसुन गोट्या खेळणार का ? नितेश राणेंचा घणाघात

Published On: 

मुंबई : अखंड महाराष्ट्राचं अराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाचरणी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व वारकरी आणि महाराष्ट्राच्या वतीनं साकडं घातलं आहे. आषाढी एकादशीच्या पर्वावर मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरच्या श्री विठ्ठल – रखुमाई मंदिरात शासकीय महापूजा पार पडली.

विठुरायाकडे साकडं घालत मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे महापूजा करावी लागेल असा स्वप्नातही विचार केला नव्हता अशी भावनिक प्रतिक्रिया दिली. ‘आता आम्ही मानवांनी हात टेकले आहेत. त्यामुळं देवा आता चमत्कार दाखव आणि कोरोनाला आजच्या या आषाढीच्या पर्वापासूनच दूर कर असं मागणं घातलं आहे. सर्व संकटं दूर नेण्यासाठी साकडं घातलं’, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या याच विधानावरून भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी – पवार साहेबांनी चमत्कार केला.. आमदार होण्यासाठी – मोदी साहेबांनी चमत्कार केला.. आता कोरोना जाण्यासाठी- विठ्ठलाने चमत्कार करावा.. मग हे काय करणार.. गोट्या खेळणार मातोश्रीत बसुन’?? अस ट्विट करत नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राणे आणि शिवसेना यांच्यात वाद सुरु झाला आहे. त्यामुळे राणेंच्या टीकेला आता शिवसेना कसं प्रत्युत्तर देणार याकडे राज्याच लक्ष लागले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!