जिनिव्हा: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यानंतर आता अनेक देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी करोना लस विकसित करण्यात येत असताना दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. करोनावरील लस ही जादूची कांडी नसून करोनाचा संसर्ग पूर्णपणे संपणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. मात्र या लसीकरण दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला इशारा देखील तिटीकाच महत्वपूर्ण आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मायकल रेयान यांनी सांगितले की, लस विकसित झाली म्हणजे आता करोनाचा पूर्णपणे खात्मा होईल अशातला भाग नाही. करोनाची लस पुढील वर्षाच्या सुरुवातीला सर्वांनाच उपलब्ध होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. करोना लस विकसित झाल्यामुळे आपल्या वैद्यकीय बचावात महत्त्वाचे साधन उपलब्ध झाले. मात्र, लसच संपूर्णपणे करोनाचा खात्मा करेल, असे मुळीच होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या ५१ लशीची मानवी चाचणी सुरू आहे. यातील १३ लस अंतिम टप्प्यात दाखल झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. ब्रिटनने फायजरने विकसित केलेल्या लशीला मंजुरी दिली असून सोमवारपासून लस देण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे रशियाने शनिवारपासून लस देण्यास सुरुवात केली आहे. रशियाने सध्या ‘स्पुनिक व्ही’ ही लस देण्यास सुरुवात केली आहे. तर, आणखी दोन लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यातील एका लशीला मंजुरी दिली आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेसस यांनीदेखील करोनाला अटकाव करण्यासाठी कोणीही लस विकसित केली तरी करोना महासाथीच्या आजाराचा खात्मा करू शकत नसल्याचे म्हटले होते. जगात कोणीही लस विकसित केली तरी फक्त लशींच्या जोरावर करोना महासाथीच्या आजारावर मात करता येणार नाही. सध्या इतर आजारांसाठी वापरण्यात येणाऱ्या लशींच्या प्रकारासारखीच ही लस वापरण्यात यावी. लस वापरास सुरुवात झाल्यानंतर सध्या सुरू असलेली उपचार पद्धत बदलून जाईल, असे होणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या
- लोकशाही मार्गाने चालणाऱ्यांना देशद्रोही, नक्षलवादी ठरवले जात आहे : सचिन सावंत
- आज भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले – उद्धव ठाकरे
- चैत्यभूमी येथे भव्य स्तूप उभारण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी
- ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात 14 डिसेंबरपासून होणार मोठा बदल
- सिद्धार्थ हॉस्टेलची इमारत लवकरच उभारणार – रामदास आठवले

