🕒 1 min read
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात आज पंतप्रधानांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. यादरम्यान पंतप्रधानांनी सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाचेही उद्घाटन केले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, कोरोना लसीकरणात भारत अग्रेसर आहे. भारताने आपली क्षमता जगाला कशी दाखवली हे पुण्यातील लोकांना चांगलेच माहीत आहे. युक्रेनच्या संकटाच्या काळातही भारत ‘ऑपरेशन गंगा’ चालवून आपल्या नागरिकांना युद्धक्षेत्रातून सुरक्षितपणे बाहेर काढत आहोत.
या पुढे बोलताना मोदी म्हणाले कि, सिम्बायोसिस हे एकमेव विद्यापीठ आहे ज्यात ‘वसुधैव कुटुंबकम’ हा स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. ज्ञानाचा व्यापक प्रसार झाला पाहिजे, संपूर्ण जगाला एक कुटुंब म्हणून जोडण्याचे माध्यम ज्ञान बनले पाहिजे, ही आपली संस्कृती पूर्वापार चालत आलेली आहे आणि ती आजही सुरू आहे हे पाहून आनंद वाटतो. याआधी पंतप्रधानांनी पुणे मेट्रोचे उदघाटन केले. तसेच इतर विकासकामाचेही उदघाटन केले. मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. पंतप्रधानांनी प्रवासादरम्यान मेट्रोमध्ये उपस्थित असलेल्या दिव्यांगांबरोबर आणि लहान मुलांबरोबरही चर्चा केली.
पुण्यातील शिक्षण आणि आयटी क्षेत्राचे कौतुक
एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान असेही म्हणाले की, पुण्याने शिक्षण, संशोधन आणि विकास, आयटी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. आधुनिक सुविधा ही पुणेकरांची गरज असून पुणेकरांची ही गरज लक्षात घेऊन आमचे सरकार काम करत असल्याचे मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
