Share

राज्यात कोरोनाच्या साडे तेरा लाख चाचण्या, राजेश टोपेंची माहिती

Published On: 

मुंबई : राज्यात रविवारी ( १३ जुलै ) ४१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रविवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख ४२ हजार ७९२ नमुन्यांपैकी २ लाख ६० हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह (१९.४३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८७ हजार ३५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ६६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १९३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२ टक्के एवढा आहे.

सचिन पायलट यांचा बंडाचा झेंडा,राहुल व प्रियांका गांधीना भेटण्यास नकार

राज्यात नोंद झालेले १९३ मृत्यू हे मुंबई मनपा-४७, ठाणे-५, ठाणे मनपा-२३, नवी मुंबई मनपा-७, कल्याण-डोंबिवली मनपा-१८, उल्हासनगर मनपा-२, भिवंडी-निजामपूर मनपा-४, वसई-विरार मनपा-६, पनवेल मनपा-५, नाशिक-१, नाशिक मनपा-९, अहमदनगर-१, अहमदनगर मनपा-१, धुळे मनपा-२, जळगाव-७, जळगाव मनपा-१, पुणे-५, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-५, सोलापूर-१,सोलापूर मनपा-६, सांगली-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-२,औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-२, लातूर-२, उस्मानाबाद-३, अकोला-२,अमरावती-१, वाशिम-१, नागपूर मनपा-१, भंडारा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप, मुंबईत उद्धव ठाकरें-थोरातांची तातडीची बैठक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!