Share

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप, मुंबईत उद्धव ठाकरें-थोरातांची तातडीची बैठक

Published On: 

मुंबई-राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशा आशयाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. पण आपण काही झाले तरी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सचिन पायलट यांनी सांगितले आहे.

भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांची सचिन पायलट भेट घेणार असून यावेळी त्यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण एनडीटीव्हीशी बोलताना हे वृत्त सचिन पायलट यांनी फेटाळून लावले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली आहे. काँग्रेस सरकारसमोर अस्थिरतेचं संकट उभं राहण्याची चिन्ह असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्हिप जारी करत काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शंभरहून अधिक आमदार उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर आमदार बसने बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी ऑल इज वेल अशी प्रतिक्रिया दिली.

राजकीय भूकंप राजस्थानमध्ये झाला असला तरीही त्याचे हादरे महाराष्ट्रात बसत आहेत. राजस्थान सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सावध पावित्रा घेतला आहे. आज मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र काँग्रेसची चाचपणी केली. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची बैठक पार पडली. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात जवळपास तासभर बैठक झाली. महाविकासाआघाडी सरकारला फटका बसू नये यासाठी काँग्रेसची नाराजी दूर करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुणे व्यापारी महासंघाचा लॉकडाऊनला विरोध मावळला,सहकार्य करण्याचे दिले आश्वासन 

संजय राऊतांनी थेट फडणवीसांना दिले आव्हान; पवारांची मुलाखत घ्यावी आणि छापण्याची हिम्मत दाखवावी !

गेहलोत सरकारवरील संकट महाराष्ट्रातील ‘हा’ धुरंधर नेता करणार दूर, राजस्थानाकडे रवाना होण्याची सूचना

भारत – नेपाळच्या मैत्रीत चीनने फूट पाडू नये; पुण्यातील नेपाळी नागरिकांच्या भावना

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!