Share

राज्यात कोरोनाच्या चाचण्यांनी ओलांडला १० लाखांचा टप्पा

Published On: 

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ६ हजार ३३० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७७ हजार २६० रुग्णांवर (ॲक्टिव्ह ) उपचार सुरू आहेत. आज ८०१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. राज्यात कोरोनाच्या चाचण्यांनी १० लाखांचा टप्पा ओलांडल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज सोडण्यात आलेल्या ८०१८ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ७०३३ (आतापर्यंत एकूण ७२ हजार २८५) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४७७ (आतापर्यंत एकूण १४ हजार ३१५), नाशिक मंडळात ३३२ (आतापर्यंत एकूण ५६०२), औरंगाबाद मंडळ ९३ (आतापर्यंत एकूण ३२१४), कोल्हापूर मंडळ १२ (आतापर्यंत एकूण १५५६), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ७०२), अकोला मंडळ ३१ (आतापर्यंत एकूण १९६४), नागपूर मंडळ ३३ (आतापर्यंत एकूण १५३४) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

राज्यात सध्या ६४ शासकीय आणि ५० खाजगी अशा एकूण ११४ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत असून दर दशलक्ष लोकसंख्येमागे राज्यातील चाचण्यांचे प्रमाण ७७१५ एवढे आहे. हे प्रमाण देशपातळीवर ६३३४ एवढे आहे. १ जुलै २०२० देशभरात ९० लाख ५६ हजार १७३ प्रयोगशाळा चाचण्या झाल्या असून त्यातील ११.२६ टक्के चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० लाख २० हजार ३६८ नमुन्यांपैकी १ लाख ८६ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.२९ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७२ हजार ३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ७४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १२५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ११० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.३८ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले १२५ मृत्यू हे मुंबई मनपा-५७, ठाणे-१, ठाणे मनपा-४, जळगाव-६, नंदूरबार-१, पुणे-२, पुणे मनपा-१८, पिंपरी चिंचवड मनपा-१, सातारा-२,कोल्हापूर-१, औरंगाबाद-४, औरंगाबाद मनपा-९, जालना-२, लातूर-१,उस्मानाबाद-२, नांदेड मनपा-१, अकोला-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.

अखेर शिवराजसिंह चौहानांच्या मंत्रिमंडळाचा झाला विस्तार; जाणून मंत्र्यांची संपूर्ण लिस्ट

आनंदाची बातमी : राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के

मोठी बातमी : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५२.४२ टक्के

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!