Share

मोठी बातमी : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५२.४२ टक्के

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात गुरवारी ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७७ हजार ४५३ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.४२ टक्के एवढे झाले आहे. आज कोरोनाच्या ४८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६३ हजार ३४२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

गुरवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी १ लाख ४७ हजार ७४१ नमुने पॉझिटिव्ह (१७.४२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५६ हजार ४२८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक, त्याच विचारांवर राज्याची वाटचाल – अजित पवार

राज्यात गुरवारी १९२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६९ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले १०९ मृत्यू हे मुंबई मनपा-५८, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१,मीरा-भाईंदर मनपा-१,वसई-विरार मनपा-२,रायगड-१ जळगाव मनपा-१, जळगाव-४, नंदूरबार-१, पुणे-१, पुणे मनपा-१६, पिंपरी-चिंचवड मनपा-४, सातारा-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-८, अकोला-१, अकोला मनपा-१, बुलढाणा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील असून इतर राज्यातील २ मृत्यूंचा समावेश आहे.

इंदुरीकर महाराजांना ‘ते’ वक्तव्य भोवलं, अखेर गुन्हा दाखल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!