Share

आनंदाची बातमी : राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या ३२१४ नवीन रुग्णांचे बुधवारी निदान झाले असून सध्या राज्यात ६२ हजार ८३३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १९२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६९ हजार ६३१ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५०.०९ टक्के एवढे झाले आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रामदेव बाबांच्या कोरोनावरील औषधाला मोदी सरकारचा झटका, घेतला हा निर्णय

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख २ हजार ७७५ नमुन्यांपैकी १ लाख ३९ हजार १० नमुने पॉझिटिव्ह (१७.३१ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ५ हजार १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार ५७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात बुधवारी २४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून यापैकी ७५ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६९ टक्के एवढा आहे.

मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी: अशोक चव्हाण

गेल्या ४८ तासात नोंद झालेल्या ७५ मृत्यूंमध्ये मुंबई मनपा-४२, भिवंडी-निजामपूर मनपा-१, धुळे मनपा-१, पुणे-१, पुणे मनपा-८, पिंपरी-चिंचवड मनपा-२, सोलापूर मनपा-१, सातारा-१, सांगली-१, रत्नागिरी-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद-८, अकोला -१, अमरावती मनपा-१, यवतमाळ-१, बुलढाणा-२ अशाप्रकारे जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील मृत्यूंची नोंद झाली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!