नाशिक- राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक सवर्सामान्य नागरिकांसह सेलिब्रेटी,राजकीय नेते देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यातच आता शिवसेनेचे धडाडीचे आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
tv9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांसह इतर अधिकाऱ्यांच्याही चिंतेत वाढ झाली आहे. नरेंद्र दराडे हे येवला शहरात राहतात. काही दिवसांपूर्वी ते नातेवाईकांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. त्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याचे त्यांना समजले. यानंतर दराडे यांनी तातडीने कोरोना तपासणी केली.
त्या तपासणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर दराडे यांनी उपचारासाठी मुंबईत धाव घेतली. त्यांच्यावर पुढील तपासणीनंतर लीलावती किंवा फोर्टिस रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी दिली.
दरम्यान, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचीही काल कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल येईपर्यंत सगळं सोनई गाव चिंतेत होतं. मात्र सुदैवाने त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आणि नागरिकांचा जीव भांड्यात पडला. शंकरराव गडाख यांच्या पत्नी सुनिता गडाख यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी स्वत: हून क्वारंटाइन झाले आहेत. सुनिता गडाख यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
काल राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना कोरोना विषाणु संसर्ग झाला आहे. औरंगाबाद येथे करण्यात आलेल्या रॅपीट अॅन्टीजन टेस्टमध्ये ही धक्कादायाक बाब समोर आली आहे. आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या दररोज संपर्कात असलेल्या समर्थकांचे मात्र धाबे दणाणले आहे. दरम्यान, शनिवारी (ता. १८) दुपारी त्यांच्या पाथरी येथील निवासस्थानाचा परिसर प्रतिबंधित घोषित करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
धोका वाढला : नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ११ हजाराच्या पुढे
भारतीय रेल्वेविरुद्ध चिनी कंपनीची कोर्टात धाव
केलेल्या पापांची फळे तर भोगावीच लागणार, या अभिनेत्याने केले सलमान खानला ट्रोल!
राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या निधनानंतर शरद पवार थेट त्या कार्यकर्त्याच्या घरी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

