मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महानगर पालिकेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. बीएमसीने हेल्पलाईन नंबर जारी केले आहे व आता मुंबईतील घराघरांमध्ये जाऊन कोरोनाची चाचणी केली जात आहे. जर कोणाला कफ, ताप, श्वसनास अडचण, बेचव अशी लक्षणे जाणवत असतील तर बीएमसी द्वारे देण्यात आलेल्या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यावर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच होतांना दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच देशात पुढील २१ दिवस लोकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तत्पूर्वीच राज्य सरकारनेही संचार बंदी लागू केलीये. कोव्हीड-१९ या संसर्गापासून बचावा साठी प्रत्येक ठिकाणच्या महानगरपालिका देखील आप-आपल्या पातळीवर प्रयत्नशील असतांना दिसून येताय.
कोव्हीड-१९ चे लक्षण स्वतःला किंवा आपल्या संपर्कांत कोणाला आढळ्यास ०२२-४७०८५०८५ या हेल्पलाईन नंबर वर संपर्क करून कळविण्याची विनंती करण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

